Ad will apear here
Next
‘अभि चॅरिटेबल’तर्फे रक्तदान, अवयवदान जागृती शिबीर
पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करताना मेधा कुलकर्णी, डॉ. जितेंद्र जोशी, दीपाली गडकरी आदी.

पुणे : सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेल्या अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान व अवयवदान जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बाणेर येथील अभि ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात आले. पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. 

अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान, अवयवदान शिबिराचे उद्घाटन करताना मेधाताई कुलकर्णी, डॉ. जितेंद्र जोशी, दीपाली गडकरी, सत्यजित कराड आदी.

‘तरुणांनी समाजासाठी व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन एकत्रित यायला हवे,’ अशी भावना मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

या शिबिरात ७५ पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. वाय. सी. एम. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. ‘रक्तदानाबरोबरच अवयवदानही महत्वाचे आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने इतर सात व्यक्तींचे जीव वाचू शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत असलेले गैरसमज काढून टाकावेत व अवयवदानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याचे काम व्हावे,’ अशी भावना डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली. 

अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान, अवयवदान शिबिरात बोलताना डॉ. जितेंद्र जोशी, तेजपाल सिंह, दीपाली गडकरी आदी.

अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी तेजपाल सिंग यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदात्यांशी संवाद साधताना डॉ. जितेंद्र जोशी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZJGBX
Similar Posts
पुलावामातील शहीद जवानांना श्रद्धांजली पुणे : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना बाणेर येथील बंटारा भवन येथे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Donate Blood, Save Life! Donate Blood, Save Life
बेला शेंडे, गणेश कुलकर्णी, केदार कुलकर्णी यांना ‘युवा’ पुरस्कार पुणे : ‘शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ यंदा महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश कुलकर्णी आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language